Showing posts with label अनुभव. Show all posts

Thursday, August 11, 2016
कवितेचे स्टॅंडर्ड
कविता ऐकणारे समजून घेणारे मिळणे हा अगदी दुर्मिळ योगायोग असतो. त्यात हि फार कमी मासिके कविता करणाऱ्यांना मान देतात,बऱ्याच वेळी त्यांना अपमान च सहन करायला लागतो. असाच एक कवीने सांगितलेला किस्सा आज सांगणार आहे मी तो हि त्यांच्या भाषेत.
Monday, August 1, 2016
गुरु पौर्णिमा
गुरु पौर्णिमा गुरुदेवांच्या शिकवणुकीला वंदन करण्याचा एक चांगला दिवस. आमच्या शाळेत सध्या गुरुपौर्णिमा झाली. आमचा कोर्स २ वर्षाचा आहे. त्यामुळे दोन्ही वर्षाची मुले मुली आली होती. नेहमी सारखे आम्ही बॅक बेंचवर बसून मजा करत होतो नेहमीच्या शाळेत फ्रंट बेंच वर असणारी मी बॅक बेंचवर बसून मजा करत होती, चक्क कंमेंट करणे चालू होते. कार्यक्रम सुरु झाला आणि आमच्यातल्या भाषणासाठी निवडलेल्या पहिल्या वर्षाच्या मुले आणि मुलींनी त्यांचे नुकतेच शिकवलेले विषय मांडले आणि त्यांची उडणारी तारांबळ बघून वाटले बरे झाले आपण नाही उभे राहिलो. पण सगळ्यांनी त्यांना छान सांभाळून घेतले. मलाही वाटत होते बोलावे पण भीती सुद्धा वाटत होती. पण जी मुले कोर्स पूर्ण करून गेली होती त्यातील काही जणांनी इतके अप्रतिम विषयानुरूप भाषण केले कि असे वाटले कि विषय शिकवायला च उभे असावेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचे सर. दोन्ही शिस्तीचे पण प्रवृत्ती एक्दम वेगळ्या असलेले एक एकदम कडक मास्टर वेळ पाळायचे धडे देणारे आणि दुसरे हसत खेळत शिकवणारे, भाषणाला टाळ्या पाडाव्यात म्हणून चक्क स्नॅक्स ठेवले नंतर आता खूप टाळ्या वाजवा हा असे मिश्किल पणे म्हणणारे.
या गुरु पौर्णिमेच्या वेळी जाणवलेली एक खास गोष्ट म्हणजे आमचे शिक्षक जे खूप तळमळीने शिकवतात आणि आम्ही सुद्धा तीच तळमळ दाखवावी म्हणून धडपडतात.नवीन शिकायला येणारी मुले जी धडपड करतात त्यांना शिक्षकांची छान शाबासकी सुद्धा आम्ही अनुभवली.

Wednesday, July 27, 2016
डायरी
आज जुनी डायरी हाती लागली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्यांदा डायरी लिहायची म्हणजे काय करायचे असा प्रश्न पडला होता. मग त्यात इतक्या गोष्टी लिहिल्या गेल्या कि आता वाचताना अगदी धमाल वाटते आहे. आनंद दुःख कुरबुरी छोट्या छोट्या गोष्टी त्या वेळी लिहिल्या आहेत ज्या आज वाचल्या तर वाटते आपण लहान पणी किती बालिश होतो ना. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती महत्वाच्या वाटतात जसे कि नवीन ड्रेस, खेळणी, साजरे केलेले वाढदिवस सगळे एकदम डोळ्यापुढे उभे राहिले. माझ्या आवडी निवडी ज्या दर वर्षी बदलत जायच्या. आणि मग त्याच्या नुसार काय व्हायचे भविष्यात ते सुद्धा बदलायचे.
अभ्यास कसा करायचा, अक्षर कसे सुधारावे ,बुद्धिबळ छान कसा खेळायचा, मेक अप कसा करावा, रेसिपी सुद्धा लिहून ठेवल्यात, अंकशास्त्र कसे वापरावे, त्याशिवाय माझ्या जुन्या कविता सुद्धा सापडल्या आणि वाटले कि खजिनाच सापडलाय.

Friday, July 22, 2016
ज्योतिष
कुठलाही विषय शिकायला सुरवात केली की कुणी त्याला मास्टर समजत नाही बर का? पण त्याला ही काही अपवाद असतातच, आणि मग जे शिकले त्याची प्रचिती समोरच्याला हवी असते. मग शिकणाऱ्याची तारांबळ उडते; की त्याला काय सांगावे हेच समजत नाही.
आता तुमच्या मनात आले असेल की असा कोणता विषय आहे जो शिकणार म्हंटल्यावर लोक आपल्या मागे लागतील. तर हा विषय आहे "ज्योतिष". नुसते ज्योतिष शिकतोय असे म्हंटले की लोक लगेच विचारतात कोणता प्रकार? मग कोणी हात दाखवू लागते तर कोणी पत्रिका. त्यांना लगेच घाई होते की कधी एकदा समोरची व्यक्ती आपले भविष्य सांगेल.जर त्याला सांगितले की 'अरे आता तर शिकायला सुरवात केली! तर लगेच म्हणतो ' ते ठीक आहे पण काहीतरी तर कळत असेल ना, सांगा की जरा '. अश्या वेळी कळत नाही हसावे की रडावे.

Monday, July 18, 2016
अभ्यास सहल
अभ्यास सहल म्हणजे मजा मस्करी शिकणे सगळेच काही असते. आमचे शिक्षक त्यांच्या ग्रुप बरोबर ईशान्य भारत येथे गेले होते तो प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितला होता. तो प्रसंग अगदी त्यांच्या शब्दात इथे देत आहे.
आमचा एक ग्रुप अभ्यास सहली साठी ईशान्य भारत येथे जाणार असे ठरले.या सहलीमुळे आमची आयुष्ये बदलतील असे आम्हाला वाटले ही नव्हते. आम्ही सगळे फार उत्साहित होतो. तिथे गेल्यावर आमचे वेगवेगळे ग्रुप पाडून आम्हाला वेगवेगळ्या गावी पाठवण्यात येणार होते. इथून निघताना काही फार माहिती नव्हती आम्हाला की तिकडे कसे आणि कोणते अनुभव आम्हाला येणार आहेत. असाच एक थरारक अनुभव आमची तिथे वाट बघत होता.
आम्ही मुंबईतून निघालो आणि मजल दरमजल करत नॉर्थ इस्ट च्या आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो. तिथे भारतातून वेगवेळ्या राज्यातून माणसे अभ्यास सहलीसाठी आली होती. सगळ्या राज्यातील माणसांचे मिळून गट पडले गेले आणि आम्हाला नॉर्थ इस्ट मधील वेगवेगळ्या राज्यात पाठवले गेले. त्या वेळी नॉर्थ इस्ट मधील राज्यात अशांतता होती. भारतीय लोकांकडे ते लोक संशयाच्या नजरेने पाहायचे.
आमचा ग्रुप एकदम जिंदादिल होता. एकमेकांशी मस्करी चालली होती. आम्ही ज्या गावी जाणार होतो तो डोंगराळ भाग असल्यामुळे बस शिवाय दुसरा मार्ग नव्हता.आमच्यासाठी एक बस ठरवली गेली. पण झाले असे की आमच्या ग्रुप मध्ये एक सरदारजी होते ते म्हणाले अरे बस मे तो व्हिडिओ वगैरे नहीं है. इतना लंबा सफर कैसे करेंगे? दुसरा बस लेते है. बाकी सगळे ग्रुप मेम्बर सुद्धा तयार झाले. त्यामुळे आम्ही त्या बस ने जाणे रद्द केले. दुसरी बस मिळण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही तिथेच विश्रांती घ्यायची ठरवली.
दुसरा दिवस उजाडला आणि ती भयानक बातमी आमच्या कानावर आली. जी बस आम्हाला घेऊन जाणार होती त्या बस मधले सगळे प्रवासी माओ वादि लोकांच्या हाती लागले आणि त्यांची निर्घृण हत्या केली गेली होती. ही बातमी कळताच सगळ्याच्या अंगावर काटा आला. त्या क्षणी असे वाटले की आपण त्या बस मध्ये असतो तर आज आपण जिवंत राहिलो नसतो. ही बातमी ऐकून ग्रुप मधील काही जणांना एकदम ताप भरला. ग्रुप ने त्या सरदारजी ना धन्यवाद दिले की त्यांच्यामुळे आज सगळ्यांचे जीव वाचले. त्यानंतर कळले की दुसऱ्या खेड्यात गेलेल्या ग्रुप ला सुद्धा स्वतःजवळचे सामान टाकून देऊन पळून यावे लागले होते.
त्या प्रसंगानंतर आमची अभ्यास सहल सुरक्षित वातावरणात पार पडली. तिथल्या वातावरणाची तिथल्या माणसांची भारताबद्दलची त्यांची मते जाणून घेण्याची आम्हाला संधी मिळाली. पण या एक प्रसंगाने आमच्या सगळ्यांच्या मनात ही अभ्यास सहल कायमची कोरली गेली. आज वीस वर्षे झाली पण अजुनी तो प्रसंग मनात तसाच ताजा आहे.

Friday, July 15, 2016
मोनालिसा -एक धमाल ग्रुप
मुलींचा ग्रुप टिकेल का नाही अशी शंका सगळेच घेतात. पण आमचा हा मुलींचा ग्रुप तयार झाला तो आमच्या मित्रामुळे त्याने पुढाकार घेतला आणि आम्ही त्याच्या मैत्रिणी एकत्र आलो. एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्ही हळूहळू एकमेकींशी छान गप्पा मारू लागलो. धीट लाजऱ्या बुजऱ्या सगळ्या प्रकारच्या मैत्रिणी आहेत ग्रुप वर आणि आम्ही सगळ्या छान सुखाने नांदू लागलो आहोत. एकमेकींची मस्करी करणे आम्हाला छान जमू लागले आहे. एकमेकींना जाणून घेण्यात रस येऊ लागला आहे. सगळ्यांची कार्यक्षेत्र वेगळी असली तरी गप्पा मारण्यात छान मजा येऊ लागली आहे.
माझा तर हा पहिलाच मुलींचा ग्रुप. त्यामुळे माझ्यासाठी खास असलेला. आम्ही भेटलो तेव्हा असे वाटले सुद्धा नाही की पहिल्यांदा भेटतोय अगदी बरीच वर्ष आमची मैत्री असावी असे वाटले. वॉटर पार्क च्या सहलीमध्ये तर एकमेकांना भिजवून टाकण्यात इतकी धमाल आली की सांगता येणार नाही. मी तर पहिल्यांदा पाण्यात उतरायला घाबरत होते पण माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी इतके छान सामावून घेतले मला की माझी पाण्याची भीतीच गेली. आता सुद्धा ग्रुपवर गप्पा गाणी गोष्टी कोडी यांची रेलचेल असते. कोडे घातले की ते सोडवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होते. खूप छान माहिती सुद्धा शेअर होते. थँक्स संजय साठी ज्याने आम्हाला एकत्र आणले.

Tuesday, July 12, 2016
प्रवास
प्रवास नवीन अनुभव देतो,गोष्टी शिकवतो आणि महत्वाचे म्हणजे नवीन माणसे त्यांच्या वृत्ती दाखवतो. अगदी आपला देश फिरताना सुद्धा वेगवेगळ्या भाषा आणि त्यांची मजा अनुभवता येते.
असाच एक प्रवास मी केला. आजही त्या प्रवासाची आठवण आली की अंगावर काटा येतो. माझी परीक्षा झाली होती. नेहमीसारखे मी आई आणि बाबा प्रवासाला निघालो. या वेळी मनाली, शिमला असा उत्तरेकडचा प्रवास होता. दिल्लीहून आम्ही कालकास्टेशनला पोचलो. त्यानंतर ते शिमला प्रवास इतका नयनरम्य होता की डोळ्याचे पारणे फिटले, अगदी माथेरानला जशी छोटी ट्रेन असते तशीच ट्रेन तिथे असते. तिथे इतके छान सौंदर्य दिसते की असे वाटते की ट्रेन मधून उतरूच नये. त्यानंतरकुलू शिमला आणि मनाली फिरून झाले.निसर्गाचे लेणे लाभले आहे या भागाला. बर्फात खेळताना फार मजा आली. त्यानंतर आम्ही धर्मशाळा या ठिकाणी जायला बसमधून निघालो. प्रवास दिवस आणि रात्रीचा होता. दिवसभर माणसे चढत उतरत होती. रात्री मात्र अगदी मोजकी ६ माणसे बस मध्ये होती. मी, आई, बाबा , बसचा कंडक्टर, ड्राइव्हर आणि अजून एक त्यांचा मित्र एवढेच होते. रात्रीचे जेवण झाले. सगळे अगदी पेंगुळले होते.
बसचा कंडक्टर मागच्या सीटवर जाऊन झोपला. मी आणि बाबा सुद्धा झोपलो. बस मध्ये फक्त ३ माणसे जागी होती माझी आई, बस चा ड्राइव्हर आणि त्याचा मित्र. ती अमावस्येची रात्र होती आणि त्या दिवशी ग्रहण सुद्धा होते. सगळे म्हणत होते आज शक्यतो प्रवास करू नका. पण पुढचे रिझर्वेशन झाले असल्यामुळे आम्हाला जाणे भाग होते. रस्ता ही सुनसान होता. रस्त्यावर लाईट सुद्धा नव्हते. फार भयाण वाटत होते. ड्राइव्हरला सुद्धा हळू हळू झोप येऊ लागली होती आणि एक वळण आले. अचानक ड्राइव्हर च्या मित्राने सिगरेट पेटवण्यासाठी काडी पेटवली आणि ड्राइव्हरला त्या प्रकाशात वळण दिसले. त्याने पटकन बस वळवली. हा सगळं प्रसंग आईने पहिला होता. आम्ही तर सगळे झोपेत होतो. पण आईने तो प्रसंग अनुभवला होता. तिच्या छातीत अगदी धस्स झाले. भल्या पहाटे आम्ही धर्मशाळा येथे उतरलो तेव्हा आईने हा प्रसंग आम्हाला सांगितला तेव्हा आम्ही अगदी भयचकित झालो आणि देवाचे आभार मानले की त्या माणसाने काडी पेटवली नसती तर आज काय झाले असते. पण आता मात्र जेव्हा या प्रसंगाची आठवण येते तेव्हा मी म्हणते की आयुष्याची दोरी बळकट होती नाहीतर हा प्रसंग सांगायला या क्षणी मी जिवंत नसते हो.... !

सोशल साईट वरची मैत्री
सोशल साईट वरची मैत्री किती टिकेल याची काही खात्री देता येत नाही. तो भेटला असाच एक सोशल साईट वर आणि मग सुरू झाल्या आमच्या गप्पा. आम्हाला दोघांना ही गप्पा मारायला खूप आवडतात हे ही कळले. हळू हळू आमच्या काही आवडी निवडी सुद्धा जुळतात हे कळले आणि छानच वाटले. तो तसा बिनधास्त मनातले पटकन सांगणारा कधी रुसणारा कधी रागावणार छान मनमोकळे वागणारा. त्याची माझी मैत्री कधी झाली कळलेच नाही. मग व्हाट्स अँपवरच्या गप्पा सुरू झाल्या. मी भेटावे असा त्याचा आग्रह आणि मी फक्त हो हो म्हणत राहिले.
एक दोनदा भेटेन म्हंटले आणि आयत्यावेळी नाहीच म्हणले. मग एकदा तलावपाळी च्या इथे भेट झाली आणि इतक्या गप्पा झाल्या की वाटले आम्ही वर्षानुवर्षे एकमेकांचे मित्र आहोत. एक छान फीलिंग आले. मग आमच्या गप्पा सुरू राहिल्या. आणि छान विश्वास निर्माण झाला आमच्यात. तो छान लिहितो आणि त्याच्यामुळे मी सुद्धा ब्लॉग लिहू लागले आहे. त्या सोशल साईट चे अगदी धन्यवाद त्याच्यासारखा छान मित्र मला मिळाला. आता तर आम्ही रुसतो रागावतो कधीतरी लहान मुलांसारखे भांडतो सुद्धा आणि मग हसतो सुद्धा. मला खूप लकी वाटते आहे त्याच्यासारखा मित्र मिळाला म्हणून.

Tuesday, July 5, 2016
सखा
आज कपाट उघडले आणि सेंट ची बाटली हाती लागली. आणि त्याची प्रकर्षाने आठवण झाली. मी मनात त्याला नेहमी सखा म्हणते. सतत मनात रुंजी घालणारा . तो वयाने मानाने दोन्ही ने माझ्यापेक्षा मोठा. पण आमचे खूप छान जुळायचे. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुद्धा मारायचो सिनेमा असो की राजकारण अगदी अध्यात्म सुद्धा आम्हाला वर्ज्य नव्हते. पण आता काही तो माझ्या बरोबर नव्हता. तो कामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाला होता. आता फक्त होत्या त्याच्या आठवणी आणि त्याचे येणारे व्हाट्स अँप वरचे मेसेज.
आज ही आठवतो आहे मला आमच्या भेटीचा तो पहिला दिवस. लोकांमध्ये नाव कमवून असलेल्या माणसाशी होणारी पहिलीच भेट होती ती . पण तो इतका साधा सुद्धा हसमुख आणि समजूतदार पणे वागला की हळू हळू आमची मैत्री कधी झाली कळले सुद्धा नाही मला. मीच बऱ्याच वेळा हट्ट करायचे की आता बोलायचे आहे पण कधी तो कामात असेल याची काही काळजीच नाही मला. पण तो फार समजूतदार नंतर बोलीन हा आता कामात आहे असे शांतपणे सांगायचा .
काही महिन्यापूर्वी असाच रस्त्यात अचानक भेटला आणि म्हणला एक गुड न्यूज आहे सांगू! मी म्हणले सांगा ना किती छान. मला एक नवीन असाइनमेंट मिळाली आहे. मी लगेच विचारले कुठे कसली
? माझे प्रश्न काही थांबेना. तो म्हणाला अग हो सांगतो सांगतो. मग त्याने सांगितले मला एक जे हवे होते ते काम करायला मिळते आहे पण मला तिथे २ वर्षासाठी शिफ्ट व्हावे लागेल. मग मी परत येईन. ओह हे ऐकल्यावर मला एकदम कळेचना कसे व्यक्त व्हावे. एकाच वेळी मला आनंद ही झाला होता की त्याला हवे ते करायला मिळते आहे म्हणून आणि दुसरीकडे आता पूर्वीसारख्या गप्पा आणि भेटी होणार नाहीत याची हुरहूर लागली होती. तसे मी कसे आहे सगळे तिकडे काम जमेल का ?हवामान सूट नाही झाले तर ? असे बरेच प्रश्न विचारून पाहिले. असे वाटले एकदा त्याला थांबवावे सांगावे तु तिकडे गेलास की मी काय करायचे एवढा छान मित्र शोधून नाही सापडणार. मनातले हे विचार बाजूला ठेवून मी त्यांचे अभिनंदन केले आणि मग तो निघून गेला. मी घरी आले आणि असे वाटले की एकदम सगळे भकास झालेय. थोडी मनाची समजूत घालायला वेळ लागला पण मग म्हंटले मी त्याची चांगली मैत्रीण आहे म्हणजे त्याला मी मोकळीक द्यायला हवी. त्याने फक्त माझ्याशी बांधून घ्यावे असे तर मैत्रीचे नाते कधीच नसते हा विचार मनात आल्यावर जरा शांत वाटले
त्याचा जाण्याचा दिवस ठरला. तो म्हणाला भेटणार आहेस का. आम्ही भेटलो गप्पा झाल्या आणि मग निघताना एक छान सेंट ची बाटली त्याने मला दिली त्याची आठवण म्हणून. मी निघाले आणि म्हणले स्वतःबद्दल कळवत राहा नवीन काय करतो आहेस ते. त्याला एकदम भरून आले मला म्हणला खूप बरे वाटले असे म्हणालीस असे वाटले कुणीतरी आहे इथे अजुनी जे माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी तेव्हढे च उत्सुक आहे.

व्हिझीट
घरी आलो,बॅग ठेवली आणि सोफ्यावर मटकन बसलो. बायको लगेच पाणी घेऊन आली. दमलास ना खूप? मी नुसतेच मानेने हो म्हंटले. कपडे बदलले आणि काही सुद्धा न बोलता पटकन झोपून गेलो.
सकाळ झाली उठलो पाहिले तर बायको रागावली आहे असे दिसले. मग भराभर माझे आटोपून घेतले आणि मग तिला विचारले काय झाले ग रागावली आहेस का ग? ती काही बोलेचना. मग पुन्हा २-३ वेळा विचारल्यावर म्हणाली किती उशीर झाला काल? काही स्वतःची काळजी आहे का नाही? नुसते काम आणि काम.
सॉरी ग काय करणार काल ७-८ व्हिझीट होत्या मग क्लिनिक ची वेळ संपल्यावर त्या पुऱ्या करे पर्येंत एवढा उशीर होणारच ना. त्यात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या कुठेच लिफ्ट नाही मग जिने चढून जीव अगदी मेटाकुटीला आला होता. त्यात हा तुफान पाऊस पण जावे तर लागणारच होते. सगळी म्हातारी माणसे त्यांना क्लिनिक ला येणे सुद्धा शक्य होत नाही. मग काय सगळीकडे जिने चढ उतार करायचे मग पेशंट ला बघायचे औषध किंवा इंजेक्शन द्यायचे. आणि एवढे करून पेशंट च्या नातेवाईकांचे हजार प्रश्न त्याची उत्तरे द्यायची जीव अगदी थकून गेला होता काल तुझ्याशी बोलण्याचे सुद्धा त्राण नव्हते उरले माझ्यात. बर म्हातारी माणसे म्हणजे त्यांना नाही सुद्धा म्हणता येत नाही. सगळ्यांना वाटते डॉक्टर व्हिझीट च्या नावाखाली अवाच्या सव्वा फी उकळतात. पण आपले श्रम आणि आपली बुद्धिमत्ता हे त्यांना दिसत नाही याचे खूप वाईट वाटते.
अरे हो तू म्हणतोस ते खरे आहे पण तुझी तब्येत सुद्धा जपायला नको का? पेशंट ना बघता बघता तू नको आजारी पडूस. मग मी मस्त हसलो आणि बायकोला म्हणलो अग मी नाही आजारी पडत ग. काळजी घेतो मी स्वतःची. आणि मला काही त्रास होत असेल तर तू आहेस ना माझी डॉक्टर. आणि ती अशी लाजली की सगळेच काही सांगावे लागत नाही हो.

Monday, July 4, 2016
आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम
मी रोज आवडती गाणी ऐकत असते. नवीन नवीन गाणी येतात ती ही माझ्या यादीत सामील होत असतात. पण काही गाणी मात्र काळजात घर करून जातात. ती ऐकली की वाटते हाय काय दर्द आहे गाण्यात. माझ्यासाठी तर हे गाणे म्हणजे अप्रतिम ट्रीट च आहे. एक प्रेयसी प्रियकराला किती प्रकारे विनविते. प्रत्येक शब्द अगदी हृदयाला भिडतो आणि वाटते की त्या आपल्या समोर बसून आपल्याला त्या विरहिणीची व्यथा सांगत आहेत. तिचे ते प्रियकराला जाण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न अगदी दृश्यमान होते. यु ट्यूब वर जरूर हे गाणे ऐका. कान तृप्त होऊन जातील. आणि आपल्या आयुष्यातील हळव्या प्रेमाची नक्की पुन्हा एकदा आठवण होईल.
https://www.youtube.com/watch?v=wqbbILfdw94

उत्तर
आपण शिकली सावरलेली माणसे सहज विचार करतो की आपल्याला सगळे कळते. काही विचारले तर पटकन उत्तर देऊ असा आपला गैरसमज असतो. आणि मग कधीतरी असे काही घडते की कळते आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही देता येत याची जाणीव आपल्याला होते.
आज सकाळी बेल वाजली आणि मी दार उघडले आमच्या कडे भांडी घासणाऱ्या बाई त्यांच्या मुलीबरोबर आल्या होत्या. ५ वर्षाची स्मार्ट चुणचुणीत मुलगी होती ती. सारखी आईच्या भोवती भोवती करत होती. एक जागी शांत काही बसत नव्हती. आणि तिची आई काम करता करता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. आई मुलीचा अगदी सुख संवाद चालू होता. मुलगी प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. आईने म्हंटले ही की अग जरा शांत बस. पण हिची आपली बडबड सुरू. आई आज शाळेत हे शिकवले मग तू खाऊ कधी आणणार आहेस मग हाच खाऊ हवा. मला तर कळेना कश्या ह्या रोज हिच्या प्रश्नांची उत्तरे देत असतील. आई ने सांगितले म्हणून पाच मिनिटे ती बाहेर येऊन बसली. त्याचे कपडे धुऊन झाले आणि मग ही परत आईजवळ जाऊन म्हणते किती वेळ लागणार आहे ग तुला लवकर चल ना. आणि अचानक तिने आईला एक प्रश्न विचारला आणि मी चकित च झाले. एवढीशी पोर पण तिच्या प्रश्नाचे उत्तर तिच्या आईला देणे अवघड होऊन बसले. ती विचारात होती आई तू दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी का करतेस ग? आणि आमच्या बाई च काय पण माझ्या ही गळ्यांत आवंढा दाटून आला. काय उत्तर द्यावे या मुलीला ?परिस्थिती शिक्षण की जगण्याची धडपड यातले काय कमी पडले असावे. तिच्या आईने तिला मोठा खाऊ घेऊन देईन असे आश्वासन दिले आणि उत्तर देण्याचे टाळले. पण त्यानंतर त्या मुलीशी नजर मिळवण्याचा मला काही धीर होईना.

कविता
आज एक कविता सुचली विचार केला त्याला वाचून दाखवावी. तो बिझी होता मग दुसऱ्या मित्रांना वाचून दाखवली त्यांना आवडली. दिवसभर या आनंदात होते मी. आणि अचानक त्याचा संध्याकाळी फोन आलाकाय छान वाटले मला, मी खुश इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग त्याला सांगितले की एक कविता केलीय वाचून दाखवू का? तो ही खुश बरेच दिवसांनी तो कविता ऐकत होता. मागची कविता ऐकून सुद्धा महिना झाला होता. कविता वाचून दाखवली मी आणि विचारले कशी आहे तर तो शांत उत्तरच देईना. मग म्हणाला तुला वाईट वाटेल नको राहू दे. मग मी विचारले आवडली नाही का तर म्हणाला कविता तशी बरी आहे पण तुझी पहिल्यांदा कविता ऐकली होती त्याची मजा यात नाही. मी विचारले म्हणजे काय. तर त्याचे म्हणणे असे की तुझ्या आजच्या कवितेत कुठे तरी काहीतरी मिसिंग आहे काहीतरी. काय मिसिंग आहे असे विचारले तर म्हणतो की माझ्या कवितेचा आत्मा हरवलाय. अरे बापरे मला तर ऐकून धक्काच बसला. असे वाटले कुठून याला कविता ऐकवली. तो म्हणतो कविता संग्रह साठी फिट नाही ही कविता. मग मी म्हंटले कविता संग्रहासाठी नाही लिहित मी कविता. मी लिहिते स्वतःसाठी.असे म्हणून फोन ठेवून दिला मी. असा राग आला आणि खूप वाईट ही वाटले. असे वाटले काही कविता लिहू नये. काय उपयोग लोकांना आवडत नसेल तर. मग काय ठेवून दिली कवितेची वही. आणि मग व्हाट्स अँप च्या फॉरवर्ड केलेल्या कविता वाचत बसले. मग दुसऱ्या मित्राने समजावले अग प्रत्येकाची मते वेगळी एवढ्यात नको नाराज होऊ. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे सुधरायला मदत होते.मी हे वाचता क्षणी माझी कळी खुलली हो.
Saturday, July 2, 2016
क्षण
आज तो येणार म्हणून तिचे हृदय धडधडत होते. तो येईल तेव्हा कसा बोलेल काय म्हणेल याच्या विचाराने ती थोडी बेचैन झाली होती. बेल वाजली तो आला. एकदम साधा शांत तिला खूप आश्चर्यच वाटले लेखक आणि तो हि एवढा मोठा असून कसला गर्व नाही कि कसले हि टेन्शन नाही. इतका सहज होता तो.
छान गप्पा झाल्या आणि राणीला अगदी तो जवळचा वाटू लागला. त्याला भेटल्यापासून तर तिला त्याची ओढ लागली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती त्याच्या मेसेज ची वाट बघू लागली. सगळीकडे तिला तोच दिसू लागला. हे थोडे वेडेपणाचे होते पण काय करणार प्रेमात सगळे माफ असते ना.
मग काय राणी आणि राजा च्या गप्पा सुरु झाल्या तिला वाटू लागले त्यालाही हि ती आवडते पण कसे विचारायचे. तिला वाटले त्याचे किती चाहते असतील आपण हि त्यातलेच एक असे वाटत असेल त्याला. पण हळू हळू तो काही बोलू लागला कि तिला वाटायचे तिच्यासाठी आहे ते. तिचे मन अधीर झाले. त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यावे असे वाटू लागले.
तो काही मनाचा थांगपत्ता लागू देत नव्हता. नुसता मला समजून घे असा हट्ट धरून बसला. आणि मग राणी ने एक दिवस राजाला विचारलेच काय वाटते तुला माझ्याबद्दल तर तो काही सांगेच ना. मग ती रुसून बसली. तिची समजूत काढांयला तो आला. ती काही ऐकायला तयार नव्हती. मग तो राणीला म्हणाला कि आज तुझी कविता वाचू या. ती कविता वाचू लागली. तिची कविता वाचताना त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि हळुवार पणे त्याचे चुंबन घेतले. ती हसली . त्याच्या कुशीत विरघळून गेली. त्याचा हात हातात घेऊन ती तो क्षण अनुभवत राहिली.
Subscribe to:
Posts (Atom)