Monday, April 16, 2018

एक्झिट प्लॅन

तुरुंग म्हणजे दुःख त्रास हेच आपल्या  हिंदी चित्रपटातून मुख्यत्वे दाखवले जाते. क्वचित तुरुंगातून पळून जाणारे कैदी जे चित्रपटाचे नट किंवा खलनायक असतात. एखादा तुरुंग त्यातून पळून जाणे याच्याशी निगडित प्लांनिंग फार कमी सिनेमातून दाखवण्यातून पाहायला मिळते.काही अपवाद नक्कीच आहेत.
   नुकताच सिल्वेस्टर स्टॅलोन आणि अरनॉल्ड यांचा एक्झिट प्लॅन नावाचा  एक सुंदर चित्रपट बघायला मिळाला. 

चित्रपटाची सुरवात एका कैद्याच्या तुरुंगातून पळून जाण्याने होते. आणि मग त्याला पकडण्याची तुरुंगातील लोकांची धडपड दिसते. आणि मग उघडकीस येते एक खाजगी कंपनी जीला  तुरुंग आणि त्यातील कच्चे दुवे    शोधून काढण्यासाठी सरकारकडून कॉन्ट्रॅक्ट मिळालेले असते.
  गुन्हेगार कसे पळून जातात. किंवा त्यांना पळून जाण्यात कुठल्या गोष्टींची मदत होते याचे सुरेख चित्रीकरण केले आहे. तुरुंग अधिकारांना जेव्हा हे कळते. तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही कि जो तुरुंग अतिशय सुरक्षित आहे असे ते समजत होते तो फोडण्यात याने काय शक्कल लढवली. आणि ती शक्कल किंवा तो प्लॅन कळल्यानंतर ते थक्क झाले.  कारण हे सगळे करण्यासाठी कैदी म्हणून राहणार माणूस या कंपनीचा भाग असतो.
 यानंतर या कंपनीला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळते ज्यात जगातील सर्वात सुरक्षित तुरुंगातील पळवाटा शोधून काढणे हा या कामाचा भाग असतो. पण त्यात एकच अट असते कि या कामासाठी त्याला कुणाचीही बाहेरून मदत घेता येणार नाही.
आणि मग सुरु होतो एक जीवघेणा प्रवास ज्यात त्या व्यक्तीची(सिल्वेस्टर स्टॅलोन ) तुरुंगातून सुटण्यासाठी धडपड सुरु होते. या तुरुंगातून सुटण्यात   त्याला मदत मिळते  तिथल्याच एका कैद्याची(अरनॉल्ड).
तुरुंगाची रचना.त्यातील हालचाली यांचा तपशीलवार अभ्यास सुरु केला जातो. हि सुटका आणि त्याची धडपड हा एक जलद प्रवास फार उत्तम रित्या चित्रित झाला आहे.

या चित्रपटाचा शेवट हा हि एक धक्कातंत्राचा भाग आहे. जो आपल्याला चकित करून सोडतो.

२ उत्तम अभिनेते कुठल्याही प्रकारची  ओव्हरऍक्टिंग न करता  अगदी सहजतेने हे रोल निभावतात. कुठेही एकमेकांवर कुरघोडी न करता सिनेमाचा वेग उत्तम रित्या त्यांनी आपल्या अभिनयाने सांभाळला आहे.