Thursday, December 19, 2019

लास्कर पेलांगी - अँड्रिया हिराता (इंडोनेशिया) - द रेनबो ट्रूपस - अँजी किलबेन (इंग्रजी अनुवाद ) सप्तरंगी फौज - डॉ. मीना शेटे प्रभू (मराठी अनुवाद )


इंडोनेशियातील बेलिटांग  बेटावरील एका खेडेगावातील एका अनोख्या शाळेचा प्रवास या कादंबरीत सुरेखपणे मांडला गेला आहे. हि एक मुहंमदीयन शाळा आहे. ह्या शाळेतील एक शिक्षक जी १५ वर्षाची मुलगी आहे. आणि याचे मुख्याध्यापक हे या शाळेचे आधार आहेत. जुनी पडायला आलेली इमारत, तुटपुंजे साहित्य असून हि त्यांची शिकवणायची तळमळ कमी झालेली नाही. कामगार वर्गातील मुलांना शाळेत आणण्यासाठी हे शिक्षक खूप प्रयत्न करताना दिसतात.
   शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वेगळाच अध्याय असतो.
पुरेसे विद्यार्थी नसतील तर शाळा बंद होईल याची भीती शिक्षकांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी असते.
याच शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना वाचवायला येतो एक मतिमंद मुलगा. ज्याच्या येण्याने शाळेतील मुलांची संख्या होते १०. आणि मग सुरु होतो  या शाळेतील १० विद्यार्थ्यांच्या  शाळेसोबतचा प्रवास
   या शाळाप्रवासात आहेत कमीत कमी गोष्टीत हि आनंद मानण्याची प्रवृत्ती, कल्पनेचा प्रवास, विचार, नवे शिक्षण, आवडीनिवडी जपणे आणि रोज शाळा शिकण्यासाठी केलेली धडपड विसरून जाण्याची तयारी.
    मतिमंद विद्यार्थी आणि धडधाकट विद्यार्थी याना घेऊन ते शालेय वर्ष सुरु होते. शाळा तपासनीस अधिकारी त्यांचा सरकारी खाक्या हे सगळे आपल्याकडील शाळा हि अनुभवत असतात.
   याच विद्यार्थ्यांमध्ये आहे एक हुशार विद्यार्थी लाटांग  ज्याच्या प्रेरणेने तिथली मुले स्वप्ने बघायला शिकतात. आणि ती पूर्ण व्हावी या साठी प्रयत्न करायाला  बघतात. मेहर हा विद्यार्थी कल्पना आणि संगीत यात प्रवीण असतो. त्यामुळे शाळेला पहिल्यांदा पदक मिळते. या शाळेकडून कुणाला कसलीही अपेक्षा नसते. पण मुलांसाठी मात्र हि शाळा एका नव्या अध्यायाची सुरवात असते. धडधाकट मुले आणि मतिमंद एकत्र शिकू शकतात हे या शाळेच्या माध्यमातून दिसून येते. आणि धडधाकट असो कि मतिमंद लहान मुले एकमेकांना छान सांभाळून घेतात  हे यात दिसते.
   शिक्षण घेताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर मात  करण्याची उर्मी त्यातून त्यांना मिळत असते.
शाळेच्या जमिनीत कथिल मिळाल्यावर शाळा पाडून टाकण्याची वेळ आल्यावर हि सगळी मुले आणि शिक्षक एकत्र येऊन विरोध करतात. त्यामुळे त्यांची शाळा वाचते.
   हि शाळा त्या १० विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकते. भविष्यात त्याचे रस्ते जरी वेगळे असले तरी या शाळेचे दुसऱ्याला जमेल तेवढी मदत करा हे संस्कार यातील सगळे विद्यार्थी कायम लक्षात ठेवतात