Tuesday, September 15, 2015

खेळ - आयुष्याचा आरसा



        आज टी व्ही वर खो खो चा खेळ  बघताना मन एकदम भूतकाळात गेले. शाळेत असताना मी खो खो खेळत होते त्याची एकदम आठवण झाली. तो खेळ बघताना अगदी मीच तिथे खेळत असावे अश्या प्रकारे मी ओरडत होते , खेळाडू आउट झाला कि हळहळत हि होते. तेव्हा जे जमले नाही ते आता जगायचा प्रयत्न करत होते. आणि मग वाटले कि खेळ आपल्याला किती मदत करतो आनंद दुख अवहेलना सगळे पचवण्याची शक्ती देतो. जो खेळाडू हे सगळे पचवू शकतो तोच मोठा होऊ शकतो. आणि मग खेळ पाहताना आपण अगदी सिनेमा सारखे रंगून जातो जसे कि आपणच आहोत त्याचे हिरो किवा हिरोइन. मग तो खेळ कुठला हि असो. कब्बडी किवा टेनिस. जेव्हा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे असतात तेव्हा आपला जीव नुसता वर खाली होत असतो प्रत्येक क्षण कसोटीचा वाटत असतो. मग तो पेस असो कि सानिया किवा कुस्तीपटू असो. आपल्याला वाटते कि आपलाच देश जिंकावा  आणि गम्मत म्हणजे तो जिंकला नाही कि वाटते कि अरेरे काय झाले हे ! आपली हि अवस्था तर जे खेळतात त्याचे काय होत असेल. मनात हुरहूर भीती आणि देशासाठी जिंकण्याची धडपड दिसून येत असते. आणि मग जिंकण्यासाठी किती क्लुप्त्या लढवणे.
      पण एक नक्की आपल्यासारखे  चाहते कुठेच मिळणार नाहीत. जिंकलो कि डोक्यावर घेणारे आणि हरलो कि खूप चिडणारे. सगळेच थोडे टोकाचे . पण याच दडपणाने खेळ चांगला होतो  म्हणतात.
       वर्षानु वर्षे बरेच वेग वेगळे खेळ आपण खेळत आलो आहोत  जसे कि  भातुकली , माझे पत्र हरवले ,काचा पाणी , कांदा फोडी , चमचा गोटी, तीन पायाची शर्यत ,  खो खो , कबड्डी , धावणे .  चेस ,बास्केट बॉल,  व्होलि बॉल, क्रिकेट , नेमबाजी ,टेनिस, फुट बॉल

आणि गम्मत म्हणजे हे खेळ खेळता खेळता आपण आयुष्यातील वेग वेगळ्या गोष्टी करायला शिकतो. हे सगळे खेळ आपल्या आयुष्यात रंगत तर आणतात च पण आयुष्य आनंदाने कसे जगावे हे हि शिकवतात.