Monday, August 27, 2018

सखीची भेट



विद्युत -हॅलो कुठे आहेस ग ? पोचलीस का? कुठला ड्रेस घातला आहेस?

सखी - हो पोचले. बॉटल ग्रीन रंगाचा पंजाबी घातलाय

विद्युत - हॅलो कशी आहेस

सखी - मस्त

विद्युत - भेळ खाऊया फेमस आहे इथली भेळ. (अरेच्चा  हि फारशी बोलत नाही )

सखी -  चालेल (माहित नाही कसा आहे हा? काय बोललेले चालते याला) 

कुणी पहिली सुरवात करायची बोलायला या विचारात पडले दोघे. सोशल साईटवर  मैत्री झाली आणि मग भेटायचे ठरले. तिच्या मनात धडधड  कसा असेल ?काय बोलेल? जमेल का आपले?  आणि त्याच्या मनात अस्वस्थता. कि कशी असेल ती? आवडेना का मी तिला ? पटेल का आमचे?

शेवटी त्याने हळुवार पणे  बोलायला सुरवात केली आणि मग ती खुलत गेली. वेळ कसा गेला कळलेच नाही. निघताना पाय निघत नव्हता तिचा पण उशीर होतोय असे सांगितल्यावर मात्र नाईलाज झाला. तिच्या डोळ्यातील त्याची ओढ आणि त्याची तिच्यासाठी असलेली आतुरता कळत होती त्यांना. पण असे काही एकमेकांना सांगायचा धीर मात्र झाला नाही त्यांना.


आज खूप दिवसांनी त्यांची भेट ठरली.   तिच्या मनात  आज हि धडधड होतीच.आज तो घरी येणार म्हंटल्यावर काय करू आणि काय नको असे झाले तिला.   बेल वाजली, दार उघडले आणि त्याला बघताच तिच्या छातीत अजून धडधड सुरु झाली. तो घरात आला आणि ती चटकन चहा करते असे म्हणून किचन मध्ये  निघून आली. चहाचे आधण ठेवून ती त्याला नाश्ता देण्यासाठी म्हणून वळली तर तो तिच्या मागे उभा राहून तिला न्याहाळत होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर मस्त लाली पसरली. त्याने मग हळूच तिला मिठीत घेतले व तिच्या ओठावर चुंबनाचा वर्षाव सुरु केला. तिचे अंग मस्त शहरायला लागले. तिने हलकेच त्याच्या कुशीतून सुटका करून घेतली. तो मात्र अजून ओठावरच्या गोड चवीची मजा घेत तिच्याकडे बघत हसत होता. आणि त्याची नजर चुकवत ती मस्त  लाजली.         


        



No comments: