Friday, September 21, 2018

मॅटर्स ऑफ द हार्ट - डॅनियल स्टील (अनुवाद :माधव कर्वे )




  होप डन  हि एक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर आहे. वेगवेगळे विषय घेऊन फोटोग्राफी करणे हा तिच्या व्यवसायाचा भाग आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफी. जगातील नामवंत लोकांचे फोटो प्रोफाईल करणे तिला जास्त आवडते. जगातील नामवंत लोकांशी या निम्मिताने तिच्या ओळखी झाल्या आहेत.
      
इतका यशस्वी प्रवास असून सुद्धा वैयक्तिक आयुष्यात दुःखाची किनार असल्यामुळे होप तशी जगापासून अलिप्त राहते आहे.

याच पार्श्वभूमीवर तिला  फील ओनील या लेखकाचे फोटो काढण्याची   व्यावसायिक ऑफर येते.  या ऑफर मुळे तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरु होतो. फील ओनील बद्दल माहित असून हि ती त्याच्याकडे आकर्षित होते. आणि मग त्या दोघांची प्रेमकहाणी फुलू लागते. त्याच्या काही गोष्टी खटकत असून हि ती त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात तिच्या पुढे फील ओनील  च्या आयुष्याची दुसरी काळी बाजू येते. आणि त्यामुळे ती हादरून जाते. तिला प्रश्न पडतो कि नक्की कोणती बाजू खरी आहे फील ओनील ची.

या सगळ्या गोंधळलेल्या मनस्थितीत तिची भेट रॉबर्ट शी होते आणि मग निर्णय घेणे होप साठी सोपे होऊन जाते.

हि कादंबरी माणसाच्या विचित्र मानसिकतेचा निराळाच अनुभव देते. निरागसता,प्रेमळपणा,अचानक स्वभावात होणारे बदल, क्रूरपणा,माणसाचे परिस्थिनुरूप बदल दाखवत राहते.

भयचकित करून टाकणारा एक अनुभव देत हादरवून टाकते.   

           



No comments: