Monday, August 27, 2018

अस्वस्थ



अगं सांग काय वाटतेय तुला माझ्याबद्दल. ती शांत बसून राहिलीय, काही उत्तरच देत नाही. तिच्या मनात विचारांचे तुफान उठलय. काय सांगू याला मी कि तू आवडतोस पण मग मनात असंख्य प्रश्न आहेतच. तिला निर्णय घेता येत नाही. अचानक ती उठते आणि त्याला सांगते थांबूया आपण इथेच नको पुढे जायला.
 असे म्हणून ती निघून जाते. तो असाच ब्लँक होतो कळतच नाही त्याला काय चुकले आपले. का नकार दिला तिने आणि मग डोळ्यातून आसवांच्या धारा सुरु होतात. खूप वेळ असाच बसून राहिल्यावर तो निघतो घरी जायला आणि मन  अस्वस्थ असते तरी घरी कुणालाच कळु देत नाही काही.

  आज या घटनेला ६ महिने झाले. रोज तो तिच्या फोनची वाट बघतो आणि तिचा फोन येत नाही तेव्हा रोज अस्वस्थ होतो.  आपल्या बाळाकडे लक्ष देताना दिवस कसे गेले ते त्याला कळत नसते. अचानक आज तिचा फोन येतो. तिचा तोच काळजी करणारा आवाज ऐकून छान वाटते त्याला. मग त्याची प्रश्नांची सरबत्ती होते तिच्यावर, कशी आहेस? काय करतेस? तब्येत कशी आहे? इतके दिवसात माझी आठवण सुद्धा झाली नाही? का वागली अशी माझ्याशी?

  राजा!तिचा कातर आवाज ऐकून तो भानावर येतो. मी तुझीच आहे रे पण माझा माझ्यावर विश्वास नव्हता उरला मग काय करणार असे वाटले माझ्यामुळे तुला त्रास नको व्हायला  म्हणून तुझ्यापासून दूर गेले. राणी तुझा विश्वास नाही का ग माझ्यावर? का ग असे वागलीस माझ्याशी? तुझ्याशिवाय एक दिवस मला चैन पडत नव्हते. असे वाटले यावे आणि तुझ्या कुशीत डोके ठेवून शांत पडून राहावे आणि मग तू माझ्या केसातून हात फिरवावा आणि मग मला कुरवाळावे. "ईश्य" काय बोलशील ना तू मला अगदी लाज वाटते हो ऐकले कि. प्रिये केव्हा   येशील भेटायला वाट बघतोय तुझी आतुरतेने. येते हा लवकरच असे राणीने म्हणताच लगेच राजाचे उत्तर "यावे राणीसरकार आपले स्वागत आहे" 

आज किती दिवसांनी कुंडीतील गुलाब मस्त फुलला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हि मस्त आनंदाचे हसू   पसरले.                     



No comments: