Thursday, December 19, 2019

लास्कर पेलांगी - अँड्रिया हिराता (इंडोनेशिया) - द रेनबो ट्रूपस - अँजी किलबेन (इंग्रजी अनुवाद ) सप्तरंगी फौज - डॉ. मीना शेटे प्रभू (मराठी अनुवाद )


इंडोनेशियातील बेलिटांग  बेटावरील एका खेडेगावातील एका अनोख्या शाळेचा प्रवास या कादंबरीत सुरेखपणे मांडला गेला आहे. हि एक मुहंमदीयन शाळा आहे. ह्या शाळेतील एक शिक्षक जी १५ वर्षाची मुलगी आहे. आणि याचे मुख्याध्यापक हे या शाळेचे आधार आहेत. जुनी पडायला आलेली इमारत, तुटपुंजे साहित्य असून हि त्यांची शिकवणायची तळमळ कमी झालेली नाही. कामगार वर्गातील मुलांना शाळेत आणण्यासाठी हे शिक्षक खूप प्रयत्न करताना दिसतात.
   शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वेगळाच अध्याय असतो.
पुरेसे विद्यार्थी नसतील तर शाळा बंद होईल याची भीती शिक्षकांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी असते.
याच शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना वाचवायला येतो एक मतिमंद मुलगा. ज्याच्या येण्याने शाळेतील मुलांची संख्या होते १०. आणि मग सुरु होतो  या शाळेतील १० विद्यार्थ्यांच्या  शाळेसोबतचा प्रवास
   या शाळाप्रवासात आहेत कमीत कमी गोष्टीत हि आनंद मानण्याची प्रवृत्ती, कल्पनेचा प्रवास, विचार, नवे शिक्षण, आवडीनिवडी जपणे आणि रोज शाळा शिकण्यासाठी केलेली धडपड विसरून जाण्याची तयारी.
    मतिमंद विद्यार्थी आणि धडधाकट विद्यार्थी याना घेऊन ते शालेय वर्ष सुरु होते. शाळा तपासनीस अधिकारी त्यांचा सरकारी खाक्या हे सगळे आपल्याकडील शाळा हि अनुभवत असतात.
   याच विद्यार्थ्यांमध्ये आहे एक हुशार विद्यार्थी लाटांग  ज्याच्या प्रेरणेने तिथली मुले स्वप्ने बघायला शिकतात. आणि ती पूर्ण व्हावी या साठी प्रयत्न करायाला  बघतात. मेहर हा विद्यार्थी कल्पना आणि संगीत यात प्रवीण असतो. त्यामुळे शाळेला पहिल्यांदा पदक मिळते. या शाळेकडून कुणाला कसलीही अपेक्षा नसते. पण मुलांसाठी मात्र हि शाळा एका नव्या अध्यायाची सुरवात असते. धडधाकट मुले आणि मतिमंद एकत्र शिकू शकतात हे या शाळेच्या माध्यमातून दिसून येते. आणि धडधाकट असो कि मतिमंद लहान मुले एकमेकांना छान सांभाळून घेतात  हे यात दिसते.
   शिक्षण घेताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर मात  करण्याची उर्मी त्यातून त्यांना मिळत असते.
शाळेच्या जमिनीत कथिल मिळाल्यावर शाळा पाडून टाकण्याची वेळ आल्यावर हि सगळी मुले आणि शिक्षक एकत्र येऊन विरोध करतात. त्यामुळे त्यांची शाळा वाचते.
   हि शाळा त्या १० विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकते. भविष्यात त्याचे रस्ते जरी वेगळे असले तरी या शाळेचे दुसऱ्याला जमेल तेवढी मदत करा हे संस्कार यातील सगळे विद्यार्थी कायम लक्षात ठेवतात

Friday, September 21, 2018

ज्योतिष शास्त्री परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तके




  1. ज्योतिष दर्पण - डॉ विनिता फाटक 
  2. जातक रत्नाकर - द्वारकानाथ नारायण राजे 
  3. व्यवसाय जातक -द्वारकानाथ नारायण राजे 
  4. गृहिणी जातक - द्वारकानाथ नारायण राजे 
  5. जातक निदान - द्वारकानाथ नारायण राजे 
  6. जातक रहस्य - द्वारकानाथ नारायण राजे 
  7. आरोग्य जातक - द्वारकानाथ नारायण राजे 
  8. जातक प्रवेश - द्वारकानाथ नारायण राजे 
  9. जातक दीप - द्वारकानाथ नारायण राजे 
  10. जातक निधी - द्वारकानाथ नारायण राजे 
  11. नक्षत्र -देवता आणि वृक्ष  - दाते पंचांगकर्ते 
  12. नक्षत्र ज्योतिष  - प्र सु आंबेकर 
  13. सर्व सुखाचे आगरु  - श्री श्री भट 
  14. कुंडलीची भाषा खंड १-४ - ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ 
  15. ज्योतिष सोबती - श्री श्री भट 
  16. सारावली - केशव वर्मा 
  17. भाग्याचे दीपस्तंभ - श्री श्री भट 
  18. ग्रह राशींशी जुळवू नाते - डॉ धुंडिराज पाठक 
  19. महाराष्ट्राचा कुंडली संग्रह - महादेव दामोदर भट  

महाराष्ट्र ज्योतिष परिषद

महाराष्ट्र ज्योतिष परिषद ब्लॉग

http://mahajyotishparishad.blogspot.com/

मॅटर्स ऑफ द हार्ट - डॅनियल स्टील (अनुवाद :माधव कर्वे )




  होप डन  हि एक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर आहे. वेगवेगळे विषय घेऊन फोटोग्राफी करणे हा तिच्या व्यवसायाचा भाग आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफी. जगातील नामवंत लोकांचे फोटो प्रोफाईल करणे तिला जास्त आवडते. जगातील नामवंत लोकांशी या निम्मिताने तिच्या ओळखी झाल्या आहेत.
      
इतका यशस्वी प्रवास असून सुद्धा वैयक्तिक आयुष्यात दुःखाची किनार असल्यामुळे होप तशी जगापासून अलिप्त राहते आहे.

याच पार्श्वभूमीवर तिला  फील ओनील या लेखकाचे फोटो काढण्याची   व्यावसायिक ऑफर येते.  या ऑफर मुळे तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरु होतो. फील ओनील बद्दल माहित असून हि ती त्याच्याकडे आकर्षित होते. आणि मग त्या दोघांची प्रेमकहाणी फुलू लागते. त्याच्या काही गोष्टी खटकत असून हि ती त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात तिच्या पुढे फील ओनील  च्या आयुष्याची दुसरी काळी बाजू येते. आणि त्यामुळे ती हादरून जाते. तिला प्रश्न पडतो कि नक्की कोणती बाजू खरी आहे फील ओनील ची.

या सगळ्या गोंधळलेल्या मनस्थितीत तिची भेट रॉबर्ट शी होते आणि मग निर्णय घेणे होप साठी सोपे होऊन जाते.

हि कादंबरी माणसाच्या विचित्र मानसिकतेचा निराळाच अनुभव देते. निरागसता,प्रेमळपणा,अचानक स्वभावात होणारे बदल, क्रूरपणा,माणसाचे परिस्थिनुरूप बदल दाखवत राहते.

भयचकित करून टाकणारा एक अनुभव देत हादरवून टाकते.   

           



Monday, August 27, 2018

सखीची भेट



विद्युत -हॅलो कुठे आहेस ग ? पोचलीस का? कुठला ड्रेस घातला आहेस?

सखी - हो पोचले. बॉटल ग्रीन रंगाचा पंजाबी घातलाय

विद्युत - हॅलो कशी आहेस

सखी - मस्त

विद्युत - भेळ खाऊया फेमस आहे इथली भेळ. (अरेच्चा  हि फारशी बोलत नाही )

सखी -  चालेल (माहित नाही कसा आहे हा? काय बोललेले चालते याला) 

कुणी पहिली सुरवात करायची बोलायला या विचारात पडले दोघे. सोशल साईटवर  मैत्री झाली आणि मग भेटायचे ठरले. तिच्या मनात धडधड  कसा असेल ?काय बोलेल? जमेल का आपले?  आणि त्याच्या मनात अस्वस्थता. कि कशी असेल ती? आवडेना का मी तिला ? पटेल का आमचे?

शेवटी त्याने हळुवार पणे  बोलायला सुरवात केली आणि मग ती खुलत गेली. वेळ कसा गेला कळलेच नाही. निघताना पाय निघत नव्हता तिचा पण उशीर होतोय असे सांगितल्यावर मात्र नाईलाज झाला. तिच्या डोळ्यातील त्याची ओढ आणि त्याची तिच्यासाठी असलेली आतुरता कळत होती त्यांना. पण असे काही एकमेकांना सांगायचा धीर मात्र झाला नाही त्यांना.


आज खूप दिवसांनी त्यांची भेट ठरली.   तिच्या मनात  आज हि धडधड होतीच.आज तो घरी येणार म्हंटल्यावर काय करू आणि काय नको असे झाले तिला.   बेल वाजली, दार उघडले आणि त्याला बघताच तिच्या छातीत अजून धडधड सुरु झाली. तो घरात आला आणि ती चटकन चहा करते असे म्हणून किचन मध्ये  निघून आली. चहाचे आधण ठेवून ती त्याला नाश्ता देण्यासाठी म्हणून वळली तर तो तिच्या मागे उभा राहून तिला न्याहाळत होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर मस्त लाली पसरली. त्याने मग हळूच तिला मिठीत घेतले व तिच्या ओठावर चुंबनाचा वर्षाव सुरु केला. तिचे अंग मस्त शहरायला लागले. तिने हलकेच त्याच्या कुशीतून सुटका करून घेतली. तो मात्र अजून ओठावरच्या गोड चवीची मजा घेत तिच्याकडे बघत हसत होता. आणि त्याची नजर चुकवत ती मस्त  लाजली.