Monday, August 22, 2016
बिहाइंड द एनिमी लाईन्स 2001
वैमानिक आणि दिशादर्शक(नेव्हिगेटर ) एका टेहळणी विमान घेऊन जातात. टेहळणी करताना त्यांना त्या भागात काही संशयास्पद हालचाली दिसतात. ते त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात शत्रू च्या विभागात पोचतात. शत्रू विमानावर मिसाईल चा मारा करून ते पडण्याचा प्रयत्न करतात. त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना ते २ मिसाईल चुकवू शकतात पण तिसरी मिसाईल अचूक हल्ला करते त्यामुळे विमान पेट घेते. ते विमानातून पॅराशूट च्या साहाय्याने बाहेर पडतात. पण ते शत्रूच्या प्रदेशात पडतात. त्यात वैमानिक जबर जख्मी होतो. तेव्हा नेव्हीगेटर त्याच्या ऑफिसर ना कळवण्यासाठी डोंगरावर जात असतो. तेवढ्यात शत्रूचे सैनिक येतात आणि वैमानिकाला शूट करतात. हे पाहून तो नेव्हीगेटर घाबरून ओरडतो. हे ऐकून ते शत्रूचे सैनिक त्याच्या मागे लागतात. तो त्यांना चकवण्यात यशस्वी होतो आणि मग सुरु होतो एक जीवघेणा पाठलाग.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment