Wednesday, June 7, 2017

मनमौजी



रात्री ९ ३० ची वेळ होती. ती  ट्रेन मधून प्रवास करत होती. आई च्या घरी जाऊन आल्यामुळे आनंदात होती. आज छान गप्पा मारायला वेळ हि मिळाला होता. रात्रीची वेळ होती त्यामुळे तशी बायकांच्या डब्यात शांतता होती. बऱ्याच जणी मोबाइल मध्ये गुंतून गेल्या होत्या. आणि बाकीच्या गप्पा मारण्यात. एवढ्यात शेजारच्या डब्यातून गाण्याचे सूर ऐकू आले. पहिल्यांदा वाटले कोण गात  असेल बरे, दिसत नव्हते कोण गातेय. पण एका वयस्कर पुरुषाचा आवाज होता  हे कळत होते. आधी वाटले एखादा भिकारी वगैरे असेल कारण ट्रेन मध्ये बऱ्याच वेळा भिकारी गाणी म्हणून भीक मागत असतात. पण हा आवाज काही वेगळाच वाटत होता. आणि तेवढ्यात तो दिसला आणि खूप आश्चर्य वाटले. उंचापुरा, वयाने म्हातारा, हातात एक जुने पुस्तक घेऊन वेगवेगळी गाणी गाणारा,स्वतःच्या मस्तीत रमलेला,त्याच्या आजूबाजूची काही माणसे दाद देत होती काही नाक मुरडत होती. काही वैतागत सुद्धा होती. पण त्याला मात्र त्याची काही सुद्धा फिकीर  वाटत नव्हती.              

तो मस्त त्याच्या धुंदीत गात होता.   तिच्याही नकळत त्याच्या गाण्याचा  ती छान आनंद घेत होती. तिला हि मग काही नवी जुनी गाणी आठवली. आणि स्वतःच्या नकळत ती गाणी ती गुणगुणू लागली.  इतरांच्या प्रतिक्रियेवर अगदी हसू आले तिला. तिच्या मनात बरेच विचार आले जसे कि मोकळेपणाने जगणे आपण तसे सोडून च देतो. सतत लोकांच्या अपेक्षांचे ओझे असते आपल्या मनावर. आणि मग एखादा असे मनासारखे वागू लागला कि मग आपण म्हणतो याला काही रीतच नाही कुठे काय वागायचे त्याची.
   पण  तिला मात्र तो कुठे तरी मनातून भावला. मनासारखा वागणारा तो एक मनमौजी वाटला.                         

3 comments:

मोकळे मन said...

आपला आनंद कुठेही व्यक्त करायला धाडस असावे लागते .प्रत्येकाच्या मनात आनंद व्यक्त करायची इच्छा असते .पण जाहीर रित्या व्यक्त करता येत नाही .पण दुसर्याकुनी केली कि तेही साथ देतात .

Unknown said...

आनंद कसा शोधायचं ह्याचं छान उदाहरण मांडलेस तू

Milind said...

Very nice